कोणतंही कारण न देता केवळ राजकीय भूमिका घेतल्यामुळे मला मालिकेतून काढण्यात आले. हा एकप्रकारचा सांस्कृतिक दहशतवादच आहे. याविरोधात मी आवाज उठवायचा ठरवला, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर शरद पवार हे एकच नाव होते. शरद पवार हे तटस्थ राहून सगळं ऐकून घेतात. आजघडीला राज्यात शरद पवार यांच्याइतका सेन्सिबल, विचारी, विवेकी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण असणारा नेता नाही, असे वक्तव्य अभिनेता किरण माने यांनी केले. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेत पोस्ट टाकल्यामुळे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. या पार्श्वभूमीवर किरण माने यांनी शनिवारी सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.